Anjali Damaniya: दमानियांचा धक्कादायक आरोपांचा बॉम्ब अन् बड्या नेत्यांची 'विकेट'; उपमुख्यमंत्र्यांसह 'या' नावांचा समावेश...

सरकारनामा ब्यूरो

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने धनंजय मंत्री मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.

Anjali Damaniya | Sarkarnama

धनंजय मुंडे यांचा राजीनामा-

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक पुरावे अंजली दमानिया यांनी सादर केले होते. सोमवारी (ता.3) ला हत्येचे फोटो व्हायरल झाल्याने अखेर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे.

Anjali Damaniya | Sarkarnama

अंजली दमानिया

धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा देण्यास प्रवृत्त करणाऱ्या अंजली दमानिया यांनी यापूर्वी ही अनेक बड्या नेत्यांना राजीनामा द्यावा लागला होता, कोण आहेत ते नेते जाणून घेऊ...

Anjali Damaniya | Sarkarnama

छगन भुजबळ

छगन भुजबळांवर डोरिन फर्नांडिस यांच घर हाडप केल्याचा आरोप होता. दमानिया यांच्यामुळे फर्नांडिस या वृद्ध महिलेला न्याय मिळाला होता. आणि छगन भुजबळ यांना त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दमानिया यांनी त्यांच्याविरोधात बनावट कंपन्यांमार्फत मनी लाँड्रिंगचा पर्दाफाश केला होता.

Chhagan Bhujbal | Sarkarnama

अजित पवार

अंजली दमानिया यांनी राज्यात गाजलेल्या 72 हजार सिंचन घोटाळा उघडकीस आणला होता. या सिंचन घोटाळ्याचे पडसाद राज्यात गाजल्यानंतर अजित पवार यांना 2012ला त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Ajit Pawar | Sarkarnama

नितीन गडकरी

अंजली दमानिया आम आदमी पक्षात असताना राज्याचे नेतृत्व करत होत्या. नितीन गडकरी यांच्याविरुद्ध नागपूरमधील निवडणूक लढवताना त्यांनी गडकरींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे नितीन गडकरी यांनी त्यांचा राजीनामा द्यावा लागला होता.

Nitin Gadkari | Sarkarnama

एकनाथ खडसे

भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचे समोर प्रकरण समोर आले होते. आणि पुण्यातील व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी उजेडात आणले होते. यामुळे एकनाथ खडसेंना 2016 मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Eknath Khadse | Sarkarnama

अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात 'आप'मध्ये कलह सुरू होता. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी पक्ष सोडल्यानंतर अंजली दमानिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला.

Arvind Kejriwal | Sarkarnama

NEXT : राज्यपालांनी महायुती सरकारच्या वाटचालीची दिशा सांगितली, कृषी धोरण ते शक्तिपीठ...

येथे क्लिक करा...