Pradeep Pendhare
3 लाख 12 हजार सौर पंप बसविले. पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांना 10 लाख सौर पंप पुरविण्यात येतील.
"प्रधानमंत्री किसान सन्मान योजना" अंतर्गत राज्यातील 95 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड.
शेतकऱ्यांना 2024-25 या वित्तीय वर्षात 74 हजार 781 कोटी रुपये इतके पीक कर्ज वितरित करण्याचे लक्ष्य असणार.
"गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार" या योजनेअंतर्गत 1274 जलाशयांमधून सुमारे चार कोटी घनमीटर गाळ काढला.
पाणलोट व्यवस्थापनच्या जनजागृतीसाठी राज्यातील 30 जिल्ह्यांतील 140 प्रकल्पांमध्ये जाणार.
1336 कोटी रुपये इतका खर्च करून 1 लाख 32 हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन लघु सिंचनाखाली आली.
शेतकऱ्यांपर्यंत विविध योजना जलदगतीने पोचवण्यासाठी “ॲग्रीस्टॅक” कृषी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या नावाची नवीन योजना सुरू.
2024-25 वर्षाकरिता, राज्यातील साखर कारखान्यांमार्फत तेल कंपन्यांना 121 कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचे लक्ष्य असणार
2024-25 या हंगामात 562 खरेदी केंद्रांमार्फत 11 लाख 21 हजार 385 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 7 लाख 80 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 814 कोटी रुपये इतके आर्थिक सहाय्य वितरित केले आहे.