सरकारनामा ब्यूरो
हरियाणातील एक असं गाव ज्या गावातून जाण्यासाठी साधा रस्ता नाही. अशा गावात राहून तिने 30 किलोमीटरचा प्रवास करत शिक्षण आणि आपले स्वप्न पूर्ण केले. वाचा अंकिता चौधरी यांची सक्सेस स्टोरी...
अंकिता या हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील छोट्याशा गावातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील साखर कारखान्यामध्ये अकाउंटंट म्हणून काम करतात.
अभ्यासात लहानपणापासूनच हुशार असलेली अंकिता यांनी दिल्लीतील हिंदू काॅलेजातून केमिस्ट्री या विषयात डिग्री मिळवली. त्यानंतर IIT दिल्लीतून मास्टर्सची डिग्री मिळवली.
मास्टर्सनंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. परीक्षेची तयार करत असताना त्यांच्या आईचे कार अपघातात निधन झाले.
त्यांनी UPSC परीक्षेची तयारी करायची नाही, असं ठरवलं होतं. परंतु वडिलांकडून मिळालेल्या प्रेरणेने त्यांनी पुन्हा परीक्षेची तयारी सुरु केली.
2018 ला त्यांनी UPSC ची परीक्षा देत संपूर्ण भारतात 14वा रँक मिळवला.
या रँकनुसार त्यांना IAS केडर मिळाले. IAS बनण्याचं संपूर्ण श्रेय त्या त्यांच्या वडिलांना देतात.