सरकारनामा ब्यूरो
जगभरातून अनेक साधू संत प्रयागराज येथील कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. अशातचं भुतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे कुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी भुतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले.
संगम घाटावर आल्यानंतर वांगचुक यांच्यासह सीएम योगी यांनी स्नान केले.
यावेळी भूतानचा राजा वांगचुक यांनी पिवळ्या रंगाचा कुर्ता तर सीएम योगींनी नारंगी रंगाचा कुर्ता घातला होता.
दौऱ्यादरम्यान त्यांनी अक्षयवट आणि हनुमान मंदिरातील देवाचे दर्शन घेतले.
सीएम योगी आदित्यनाथ यांच्यासह राजा वांगचुक यांनी आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होत प्रार्थना आणि महाआरती केली.
राजा वांगचुक हे पहिल्यांदाच लखनऊ दौऱ्यावर आले आहेत.
भूतानचे राजा वांगचुक आणि महारानी जिग्मे सिंघे वांगचुक हे 2024 ला दिल्ली दौऱ्यावर आले होते.