Ganesh Sonawane
पंजाबमधील खरार विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या आमदार अनमोल गगन मान यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.
'मी दु:खी मनाने राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली होती. त्यामुळे त्या चर्चेत आल्या.
परंतु अनमोल गगन मान यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारलेला नाही असे सांगितले जात आहे.
अनमोल गगन मान या प्रसिद्ध पंजाबी गायिका आणि अभिनेत्री आहेत. २०२० मध्ये त्या आम आदमी पक्षामध्ये सहभागी झाल्या होत्या.
२०२२ च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी पक्षाने तिकीट दिले होते. मोहालीतील खरार विधानसभा मतदारसंघातून अनमोल गगन मान आमदार म्हणून निवडून आल्या.
त्यावेळी आप पक्षाच्या त्या सर्वात तरुण आमदार ठरल्या होत्या. त्यांच्याकडे पर्यटन आणि संस्कृती विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.
अनमोल गगन मान यांचा जन्म १९९० मध्ये मानसा येथे झाला. चंडीगडमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रात काम केले. त्यानंतर अनमोल संगीत क्षेत्राकडे वळल्या.
अनमोल गगन मान यांनी १६ जून २०२४ रोजी वकील शाहबाज सिंह सोही यांच्याशी लग्न केले. शाहबाज सिंह हे पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयामध्ये वकील आहेत
NEXT : पुतिन यांना भिडणार ‘ही’ रणरागिणी; धडाकेबाज कामगिरीने वेधलं जगाचं लक्ष...