Rajanand More
जगात सध्या यूलिया स्विरीडेन्को या नावाची बरीच चर्च सुरू आहे. त्यांच्या गळ्यात नुकतीच यूक्रेनच्या पंतप्रधान पदाची माळ पडली आहे. यापूर्वी ते अर्थमंत्री होत्या.
यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदोमिर झेलेंस्की यांनी यूलिया यांचे प्रमोशन केले आहे. रशियासोबत शीतयुध्द सुरू असतानाच त्यांनी केलेला हा राजकीय बदल महत्वाचा मानला जात आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये यूक्रेनच्या संसदेने यूलिया यांना पहिल्या उपपंतप्रधान आणि आर्थिक विकास मंत्री बनवले होते. तेव्हापासूनच त्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होत्या.
सध्या रशिया आणि यूक्रेनमधील संबंध प्रचंड ताणले गेले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे माघार घ्यायला तयार नाहीत. अशा स्थितीत पुतिन यांना भिडताना देशाचा गाडा हाकण्याची कसरत यूलिया यांना करावी लागणार आहे.
अर्थमंत्री असताना यूलिया यांनी अमेरिकेसोबत महत्वपूर्ण खनिज करार केला. या कराराने त्यांना जागतिक ओळख मिळवून दिली. करारातील अटी यूक्रेनसाठी फायदेशीर ठरतील, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.
यूलिया यांची ओळख अर्थतज्ज्ञ म्हणूनही आहे. त्यामुळे यूक्रेन आणि अमेरिकेतील आर्थिक संबंध सुधारण्यासाठी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व असते.
यूलिया या झेलेंस्की यांच्या विश्वासू सरकारी मानल्या जातात. पश्चिमेकतील देशांसोबत यूक्रेनचा संवाद वाढविण्यातील त्या महत्वाच्या मानल्या जातात. इंग्रजी आणि चीनी भाषेवर त्यांचे प्रभूत्व आहे.
2023 मध्ये टाईम मॅगझीनने प्रसिध्द केलेल्या जगातील 100 युवा नेत्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. त्या केवळ 40 वर्षांच्या आहेत. त्यामुळे जगातील कमी वयाच्या पंतप्रधानांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.