Rashmi Mane
पश्चिम बंगालमधील महिलांसाठी सरकारने नवी आर्थिक मदत योजना जाहीर केली आहे. ‘अन्नपूर्णा भंडार योजना’ अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा थेट 3000 जमा केले जाणार आहेत.
महागाईच्या काळात महिलांना आर्थिक आधार मिळावा, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात आणि त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हाव्यात, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी या योजनेची घोषणा केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आरोग्य व कुटुंबाच्या गरजांसाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे.
या योजनेत पात्र महिलांना दरमहा 3000 आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ही रक्कम थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
यापूर्वी सुरू असलेल्या ‘लक्ष्मी भंडार योजने’त महिलांना जास्तीत जास्त 1500 मिळत होते. नव्या योजनेत ही मदत दुप्पट करण्यात आली आहे.
अर्जदार महिला असावी, पश्चिम बंगालची कायमस्वरूपी रहिवासी असावी आणि तिचे वय 25 ते 60 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
महिला आयकरदाते नसावी. सरकारी किंवा निवृत्त कर्मचारी नसावी. तसेच कोणत्याही सरकारी संस्थेकडून पगार किंवा पेन्शन मिळत नसावी.
पात्र महिला ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात. अधिकृत पोर्टलवर फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. तसेच पंचायत, ब्लॉक किंवा नगरपालिका कार्यालयातूनही अर्ज सादर करता येईल.