Aadhaar authentication history check : तुमच्या नकळत कोण करतंय तुमच्या 'आधार'चा वापर? घरबसल्या अवघ्या 2 मिनिटांत अशी घ्या माहिती!

Rashmi Mane

आधारचा वापर

आधार कार्ड आज बँकिंग, सरकारी योजना, मोबाईल सिम आणि अनेक महत्त्वाच्या सेवांसाठी आवश्यक झाले आहे. मात्र, वाढत्या वापरासोबत गैरवापराचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे तुमचा आधार कोण वापरत आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

Aadhar New Rule | Sarkarnama

UIDAI ची खास सुविधा

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) नागरिकांना आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री पाहण्याची सुविधा देते. यामुळे तुमचा आधार कधी, कुठे आणि कोणत्या कारणासाठी वापरण्यात आला याची माहिती मिळू शकते.

Aadhar New Rule | Sarkarnama

घरबसल्या करा तपासणी

ही सुविधा पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध आहे. मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या मदतीने काही मिनिटांत तुम्ही आधार वापराचा संपूर्ण इतिहास तपासू शकता.

लॉगिन कसे कराल?

My Aadhaar पोर्टलवर जा. 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP भरून लॉगिन करा. त्यानंतर Authentication History हा पर्याय निवडा.

Aadhar Card | Sarkarnama

पाहा मागील 6 महिन्यांचा डेटा

तुम्ही आवडीची तारीख निवडून मागील 6 महिन्यांपर्यंतचा रेकॉर्ड पाहू शकता. बायोमेट्रिक, OTP किंवा सर्व प्रकारच्या ऑथेंटिकेशनची माहिती येथे उपलब्ध असते.

रिपोर्टमध्ये काय दिसेल?

आधारचा वापर कोणत्या माध्यमातून झाला, तारीख आणि वेळ काय होती तसेच कोणत्या बँक, टेलिकॉम कंपनी किंवा सरकारी विभागाने पडताळणी केली याची सविस्तर माहिती रिपोर्टमध्ये दिसते.

Aadhar Card | Sarkarnama

बायोमेट्रिक लॉक करा

UIDAI बायोमेट्रिक लॉकची सुविधाही देते. फिंगरप्रिंट आणि आयरिसची माहिती लॉक केल्यास तुमच्या परवानगीशिवाय कोणीही बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करू शकत नाही.

Aadhar New Rule | Sarkarnama

संशयास्पद वापर दिसल्यास?

ऑथेंटिकेशन हिस्ट्रीमध्ये अनोळखी नोंद आढळल्यास तात्काळ UIDAI हेल्पलाइन 1947 वर संपर्क करा, ऑनलाइन तक्रार नोंदवा आणि बायोमेट्रिक डेटा लॉक करा. नियमित तपासणी केल्यास फसवणूक आणि डेटा गैरवापरापासून स्वतःचे संरक्षण करता येते.

Aadhar Card | Sarkarnama

Next : "त्या" एका अपमानाने बदललं आयुष्य! रिक्षाचालकाच्या मुलाने थेट 'IAS' बनून कसं दिलं सडेतोड उत्तर?

येथे क्लिक करा