Anshika Jain : पाचव्या वर्षी आई-वडिलांचं छत्र हरवलं, पण आजीच्या स्वप्नांसाठी तिने जिवाचं रान केलं अन् IPS बनली

Jagdish Patil

आई-वडिलांचं छत्र

आई-वडिलांचं छत्र हरवल्यानंतर आयुष्य जगणं खूपच कठीण होऊन जातं. पण जिद्दी आणि धाडसी लोक अशा परिस्थितीवर मात करत यशाला गवसणी घालतात.

Anshika Jain IPS Success Story

अंशिका जैन

याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंशिका जैन आहेत. लहानपणी आई-वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांनी कठोर परिश्रम करत UPSC क्रॅक केली.

Anshika Jain IPS Success Story | Sarkarnama

IPS

या परीक्षेत 5 वेळा अपयशी झाल्यानंतरही त्यांनी हार न मानता आणि कोणत्याही कोचिंगशिवाय अभ्यास केला आणि अखेर IPS अधिकारी बनल्या.

Anshika Jain IPS Success Story | Sarkarnama

पालनपोषण

अंशिका अवघ्या पाच वर्षांच्या असताना त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आजी आणि काकांनी त्यांचं पालनपोषण केलं.

Anshika Jain IPS Success Story | Sarkarnama

स्वप्न

शिक्षिका असलेल्या आजीचं त्यांची नात अधिकारी व्हावी, असं स्वप्न होतं. शिवाय आजीनेच अंशिका यांना अधिकारी होण्यासाठी प्रेरणा दिली.

Anshika Jain IPS Success Story | Sarkarnama

शिक्षण

अंशिका यांनी दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमधून B.com आणि M.com चं शिक्षण पूर्ण केलं.

Anshika Jain IPS Success Story | Sarkarnama

नोकरी

या काळातच त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यासमोर अनेक नोकरीच्या संधी होत्या. तरीही त्यांनी UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

Anshika Jain IPS Success Story | Sarkarnama

आजीचं निधन

2019 ला अंशिकावर दु:खाचा डोंगर कोसळळा कारण अंशिका UPSC ची तयारी करत असतानाच आजीचे निधन झाले.

Anshika Jain IPS Success Story | Sarkarnama

UPSC क्रॅक

मात्र, तरीही खचून न जाता त्यांनी पुन्हा नव्या जोमाने अभ्यास केला. अखेर त्यांनी यशाला गवसणी घातली आणि 2022 मध्ये त्यांनी 306 रँकने UPSC क्रॅक केली.

Anshika Jain IPS Success Story

NEXT : भेळीचा बेत अन् PM मोदींच्या चेहऱ्यावरील ग्लो..! विश्वविजेत्या महिला क्रिकेट टीमने असा केला जल्लोष...

PM Modi with team India | Sarkarnama
क्लिक करा