Rajanand More
भारतीय महिला क्रिकेट टीमने एकदिवसीय आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकत इतिहास घडवला आहे. या टीमवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विश्वविजेत्या टीमने नुकतीच भेट घेतली. टीममधील सर्व सदस्यांनी पंतप्रधानांशी दिलखुलास संवाद साधला.
भेटीदरम्यान खेळाडूंसाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेळीसह विविध पदार्थांची मेजवानी होती. पंतप्रधानांनी आपल्या हाताने खेळाडूंना लाडू देत विजयाचा आनंद साजरा केला.
पंतप्रधान यांचा खेळाडूंसह प्रशिक्षकांसोबत गप्पांचा डाव रंगला होता. यावेळी महिला खेळाडूंनी मोदींना अनेक प्रश्न विचारले. तर मोदींनी खेळाडूंच्या भावना जाणून घेतल्या.
फलंदाज हरलीन देओलने सर, तुमचे स्कीनकेअर रुटीन काय आहे, तुम्ही खूप ग्लो करता, असा प्रश्न विचारला. त्यावर पंतप्रधानांसह इतर खेळाडूंनाही हसू आवरले आहे.
माझे या विषयाकडे फारसे लक्ष गेले नव्हते, असे उत्तर पंतप्रधानांनी हसत हसतच दिले. त्यावर स्नेह राणा हिने लगेचच हे तर कोट्यवधी लोकांचे प्रेम असल्याचे म्हटले.
पंतप्रधानांशी बोलताना उपकर्णधार स्मृती मंधाना म्हणाली, विश्वचषक जिंकण्याचा हेतू केवळ ट्रॉफी जिंकणे नव्हता, तर भारतात महिला खेळाडूंविषयीचे विचार बदलणे हा होता.
पंतप्रधान मोदींनी मागील वर्षी टी-२० विश्वचषक जिंकलेल्या पुरूंषांच्या क्रिकेट टीमची भेट घेतली होती. आता महिला खेळाडूंची भेट घेत त्यांनी तोंडभरून कौतुक केले.