Rashmi Mane
राज्याच्या इतिहासातील पहिली मोठी भरती 'अनुकंपा'च्या दहा हजार जागा भरती होणार.
राज्य सरकारने अनुकंपा तत्त्वावरील तब्बल 10 हजार जागा भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.
कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमावल्यावर उरलेल्या कुटुंबातील सदस्याला नोकरीची संधी मिळावी म्हणून ही भरती केली जाते.
कायदेशीर अडथळे, किचकट प्रक्रिया आणि मंजुरीसाठी फाईल वरच्या स्तरापर्यंत जाण्यामुळे या नियुक्त्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्या होत्या.
सध्या राज्यात जवळपास नऊ हजार 658 अनुकंपा अर्ज बाकी आहेत. हे सर्व अर्ज 15 सप्टेंबरपर्यंत निकाली काढून नियुक्त्या देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
पंचायत राज, जिल्हा परिषद, महानगरपालिका, ग्रामीण व शहरी विकास संस्था या विभागात भरती होणार आहे.
या प्रक्रियेत गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील जागांचा मोठा समावेश आहे. यापूर्वी ‘ड’ वर्गातील अनेक पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात होती. त्यामुळे वारसांना नोकरी मिळण्यात अडथळे येत होते. आता नवीन आदेशानुसार गट ‘क’ मधील सरळसेवा भरतीतील 20 टक्के जागा अनुकंपासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.