Rashmi Mane
जीएसटीमध्ये मोठा बदल झाला असून आता फक्त 2 टॅक्स स्लॅब राहणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या बदलामुळे रोजच्या वापरातील वस्तू स्वस्त होणार आहेत. याचा सर्वाधिक फायदा महिलांना झाला आहे.
साबण, टूथपेस्ट, शॅम्पू या वस्तूसाठी पूर्वी 18% जीएसटी भरावा लागत होता. आता फक्त 5% जीएसटी लागू होणार आहे.
महिलांसाठी आवश्यक वस्तू सॅनिटरी नॅपकीनवर जीएसटी 12% वरून 5% करण्यात आला आहे.
हँडबॅग, पर्स आणि शॉपिंग बॅग्स या वस्तूवर पूर्वी 12% कर भरावा लागत होता. आता फक्त 5% जीएसटी आकारला जाणार आहे.
रोटी, पनीर आणि प्रोसेस्ड दूध या वस्तूंवरील कर पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. आता या वस्तू अधिक स्वस्त होणार आहेत.
जीएसटी स्लॅबमधील बदलामुळे घरगुती खर्चात थेट बचत होणार आहे. महागाईच्या काळात जीएसटी बदल हा खूप मोठा दिलासा ठरणार आहे.
स्वच्छता, आरोग्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त झाल्यामुळे महिलांच्या खर्चाचा भार कमी होणार आहे.