Aslam Shanedivan
देशात असे अनेक IPS आणि IAS अधिकारी आहेत ज्यांनी महिन्याला लाखांचा पगार असणारा प्रायव्हेट जॉब सोडला आहे.
यात रामपूर जिल्ह्याच्या असणाऱ्या IPS अपर्णा रजत कौशिक यांचा समावेश असून त्यांनी 2014 मध्ये युसीएससी क्रॅक केली
IPS अपर्णा रजत कौशिक या 2015 बॅचच्या अधिकारी असून त्या युपीच्या अमेठी येथे जिल्हा पोलिस अधिक्षक आहेत
अपर्णा कौशिक या प्रयागराज येथील एनआयटीमधून बीटेक झाल्या असून त्या 2012 मध्ये प्लेसमेंटमधून जॉब करत होत्या
कॅम्पस प्लेसमेंटमधून त्यांना वर्षाला 18 लाख रूपये पॅकेज असणारा जॉब मिळाला होता. पण त्यांचे त्यात मन लागले नाही. यामुळे त्यांनी युपीएसीची तयारी करण्याचा निर्णय घेतला
अपर्णा कौशिक यांनी युपीएससी क्रॅक करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवताना सेल्फ स्टडीवर फोकस केला होता. आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी युपीएससीची सीएसई क्रॅक केली होती.
अपर्णा कौशिक या पहिल्यापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्या 10 वीत स्टेट टॉपर राहिल्या असून 12वीत फर्स्ट क्लॉसने पास झाल्या आहेत.