Jagdish Patil
पंजाबमधील आम आदमी पार्टीचे आमदार गुरप्रीत गोगी यांचा गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
त्यांच्या मृत्यूनंतर आप कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. तर गोळी लागून मृत्यू झालेले आमदार गोगी कोण होते ते जाणून घेऊया.
गुरप्रीत गोगी यांचा जन्म 26 सप्टेंबर 1967 साली झाला.
ते लुधियाना पश्चिम येथील आम आदमी पार्टीचे आमदार होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते.
2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गोगी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपमध्ये प्रवेश केला होता.
2022 च्या आधी ते 23 वर्षे ते काँग्रेस पक्षात सक्रिय होते. महापालिकेत ते 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
2014 ते 2019 या काळात ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही होते. यासह त्यांनी पक्षात विविध पदांवर काम केलं होतं.
वृत्तानुसार, रात्रीचं जेवण करून ते आपल्या खोलीत गेल्यानंतर अचानक गोळीबाराचा आवाज आला. मात्र, त्यांना गोळी कोणी मारली की स्वत: मारून घेतली? हे स्पष्ट झालेलं नाही.