Rashmi Mane
UPSC नागरी सेवा परीक्षेद्वारे केवळ IAS किंवा IPS नाही तर 24 वेगवेगळ्या सेवांमध्ये मिळते नोकरी. चला जाणून घेऊया त्यापैकी काही खास करिअरचे पर्याय!
भारताचे परराष्ट्र धोरण राबवणारी ही सेवा. IFS अधिकारी राजदूत, दूतावास प्रमुख, आंतरराष्ट्रीय चर्चांतील प्रतिनिधी म्हणून काम करतात.
करसंकलन, टॅक्स तपासणी, आर्थिक गुन्ह्यांचे नियंत्रण यामध्ये IRS अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
सरकारी खर्चांचे लेखापरीक्षण आणि पारदर्शकता राखणे यासाठी IAAS अधिकारी CAG अंतर्गत कार्य करतात.
डाक विभागाचे व्यवस्थापन, नवीन योजना राबवणे आणि डिजिटल पोस्ट सेवा सुधारणा यामध्ये IPoS अधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा असतो.
भारतीय रेल्वेच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी IRAS अधिकारी बजेट नियोजन, लेखा आणि खर्च नियंत्रण यामध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात.
IDES अधिकारी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मालमत्तेचे व्यवस्थापन व संरक्षण प्रकल्पांसाठी जागा संपादन करतात.
IIS अधिकारी PIB, AIR, दूरदर्शनसारख्या संस्थांमधून सरकारी माहितीचे प्रसारण आणि जनतेपर्यंत योग्य संदेश पोहोचवण्याचे काम करतात.