Rashmi Mane
फक्त काही स्टेप्समध्ये मिळवा तुमचं e-PAN, तेही पूर्णपणे ऑनलाइन आणि मोफत!
E-PAN म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातले पॅन कार्ड, जे आयकर विभागाद्वारे जारी केले जाते आणि वैध ओळख म्हणून स्वीकारले जाते.
भारतीय नागरिक
18 वर्षांहून अधिक वयाचे
ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे
ज्यांनी आधी PAN घेतलेले नाही
फक्त आधार कार्ड पुरेसे आहे! मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक.
www.incometax.gov.in या वेबसाइटवर जाऊन 'Instant e-PAN' या पर्यायावर क्लिक करा.
'Get New E-PAN' वर क्लिक करा. आधार क्रमांक टाका. OTP वेरिफाय करा (मोबाईलवर OTP येईल).
तुमची माहिती आधारावरून आपोआप भरली जाईल.
ती तपासा आणि सबमिट करा.
काही मिनिटांतच तुम्हाला e-PAN तयार होईल.
सबमिशन झाल्यानंतर, तुम्ही E-PAN PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.
तो सिग्नेचरसहित वैध असतो.