Rashmi Mane
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळणार खास गोल्डन कार्ड. केंद्र सरकार नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी आयुष्मान भारत योजना राबवत आहे.
हे असे कार्ड आहे जे दाखवून तुम्ही निवडक रुग्णालयात 5 लाखांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकता.
हे कार्ड आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना साठी उपयोगी आहे.
या योजनेमुळे 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, 1365 शस्त्रक्रिया व उपचार समाविष्ट आहे.
70+ वयोगटातील नागरिकांना या योजनेचा खास लाभ होणार आहे.
हे कार्ड प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मिळणार आहे.
31 ऑगस्ट 2025 पर्यंत विशेष मोहीम राबवली जात आहे. नागरिकांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
या योजनेसाठी अर्ज करणं अगदी सोप आहे. आयुष्मान अॅप डाउनलोड करा किंवा beneficiary.nha.gov.in या वेबसाइटवर अर्ज करू शकता.
घरबसल्या अर्ज करून मिळवा आयुष्मान गोल्डन कार्ड आणि घ्या मोफत उपचाराचा लाभ घ्या.