Rashmi Mane
Tejas नाही तर भारताचा पहिला स्वदेशी फाइटर जेट कोणता होता? 90% भारतीयांना याचं नाव माहिती नसेल.
कोणत्याही देशाच्या सुरक्षेसाठी आधुनिक शस्त्रास्त्रं आणि लढाऊ विमानं खूप महत्त्वाची असतात. ती देशाला सुरक्षित ठेवतात.
भारत नेहमीच परदेशी शस्त्रांवर अवलंबून राहण्यापेक्षा, स्वतःची शस्त्रं आणि फाइटर जेट्स बनवण्यावर भर देत आला आहे.
आज भारताकडे आधुनिक पिढीची अनेक लढाऊ विमानं आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, भारताचं पहिलं स्वदेशी फाइटर जेट कोणतं होतं?
भारताचं पहिलं स्वदेशी फाइटर जेट होतं – HAL HF-24 Marut याची रचना 1961 मध्ये करण्यात आली होती.
या जेटचं नाव ठेवलं होतं – ‘मरुत’ ज्याचा अर्थ होतो "हवेचा देवता" हे नाव त्याच्या वेग आणि शक्तीचं प्रतीक होतं.
जर्मन शास्त्रज्ञ कर्ट टँक यांच्या नेतृत्वाखाली Hindustan Aeronautics Limited (HAL) ने Marut तयार केला.
HAL Marut भारतीय वायुदलात 1967 मध्ये दाखल झाला. 1971 च्या भारत–पाक युद्धात या जेटने शौर्य दाखवलं होतं.