Vijaykumar Dudhale
माणिकराव ठाकरे हे गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जातात.
माणिकराव ठाकरे हे २००८ ते २०१५ दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते.
ठाकरे यांच्याकडे जानेवारी २०२३ मध्ये तेलंगणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा विधानसभा मतदारसंघातून माणिकराव ठाकरे हे १९८५ पासून २००४ पर्यंत निवडून येत होते
माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.
विधान परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही माणिकराव ठाकरे यांनी २००३ ते २००४ या काळात काम पाहिले.
तेलंगणात काँग्रेसच्या विजयात माणिकराव यांच्या प्रचाराच्या मॅनेजमेंटचा मोठे योगदान मानले जात आहे.
तेलंगणातील दमदार कामगिरी लक्षात घेऊन काँग्रेस हायकमांडने ठाकरे यांच्याकडे तीन राज्यांचे प्रभारीपद देण्यात आले आहे. त्यात गोवा, दादरा नगर हवेली आणि दीव-दमण या राज्यांचा समावेश आहे