Sambhaji Patil Nilangekar : लातूरची मोहिम फत्ते करून संभाजी पाटील निलंगेकर बीडच्या मोहिमेवर...

Vijaykumar Dudhale

श्रृंगारे यांच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत सुधाकर श्रृंगारे यांच्या उमेदवारीपासून त्यांना निवडून आणण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत संभाजी पाटील निलंगेकर यांची भूमिका महत्वपूर्ण होती.

Sambhaji Patil Nilangekar | Sarkarnama

शृंगारेंचा 2 लाख 89 हजार मतांनी विजय

मागील निवडणुकीत सुधाकर श्रृंगारे यांना निवडून आणण्याची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांनी घेतली होती. त्या निवडणुकीत शृंगारे यांना 2 लाख 89 हजार मतांनी निवडून आणले होते.

Sambhaji Patil Nilangekar | Sarkarnama

लातूरचे संयोजक

यंदाच्या 2024 च्या निवडणुकीत ते अंतर राखून होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे संयोजक म्हणून संभाजी पाटील निलंगेकर यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर ते लातूरच्या निवडणुकीत सक्रीय झाले होते.

Sambhaji Patil Nilangekar | Sarkarnama

नवी जबाबदारी

लोकसभेच्या लातूर मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

Sambhaji Patil Nilangekar | Sarkarnama

बीडचे निरीक्षक

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची बीड लोकसभेच्या निरीक्षकपदी तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे.

Sambhaji Patil Nilangekar | Sarkarnama

पंकजा मुंडेंसाठी रिंगणात

महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना बीडमध्ये मराठा समाजाकडून होणारा विरोध लक्षात घेता, तो थोपवण्याची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर देण्यात आली आहे.

Sambhaji Patil Nilangekar | Sarkarnama

बीडमध्ये मुक्काम

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांच्या आदेशानुसार संभाजी पाटील निलंगेकर तातडीने बीडमध्ये कामाला लागले आहेत. 11 मे म्हणजे प्रचार संपेपर्यंत निलंगेकर यांना बीडमध्येच मुक्काम ठोकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Sambhaji Patil Nilangekar | Sarkarnama

मराठा समाजाचा विरोध

पंकजा मुंडे यांची लढत महाविकास आघाडीचे बंजरंग सोनवणे यांच्याशी होत आहे. बीड मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या लक्षणीय आणि निर्णायक आहे. प्रचारादरम्यान त्यांना काही भागात आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजाचा विरोध सहन करावा लागत आहे.

Sambhaji Patil Nilangekar | Sarkarnama

नरेंद्र दाभोलकर हत्या ते निकाल, 11 वर्षांत काय घडलं? वाचा सविस्तर...

Narendra Dabholkar Case | Sarkarnama