हकालपट्टी झालेल्या ग्लॅमरस महिला नेत्याची काँग्रेसमध्ये घरवापसी; विधानसभेचे तिकीट मिळणार?

Rajanand More

अर्चना गौतम

उत्तर प्रदेशात अर्चना गौतम या नावाची पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. चार वर्षांच्या संघर्षानंतर त्यांची नुकतीच काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे.

Archana Gautam | Sarkarnama

हकालपट्टी

पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या आरोपावरून २०२३ मध्ये काँग्रेसने त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली होती. त्याआधी त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती.

Archana Gautam | Sarkarnama

कोण आहेत अर्चना?

अर्चना गौतम या प्रसिध्द मॉडेल आहेत. त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. बिग बॉस १६ मध्येही त्या स्पर्धक होत्या. पत्रकारिता आणि जनसंपर्क विषयात त्यांनी पदवी घेतली.

Archana Gautam | Sarkarnama

मिस उत्तर प्रदेश

मिस उत्तर प्रदेश या २०१४ मध्ये झालेल्या स्पर्धेचा पुरस्कार मिळवत त्यांची मॉडेलिंग क्षेत्रात वाटचाल सुरू झाली. त्यानंतर त्यांनी मॉडेलिंग आणि मनोरंजन क्षेत्रात आपले पाय रोवले.

Archana Gautam | Sarkarnama

राजकारणात एन्ट्री

उत्तर प्रदेशाच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीआधी अर्चना यांची राजकारणात एन्ट्री झाली. त्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Archana Gautam | Sarkarnama

लड़ सकती हूं

अर्चना गौतम यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या 'लडकी हूं, लड़ सकती हूं' या मोहिमेपासून प्रेरणा घेत राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता.

Archana Gautam | Sarkarnama

निवडणूक

विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसने मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पण त्यांना केवळ १ हजार ५१९ मते मिळाली होती.

Archana Gautam | Sarkarnama

धक्काबुक्की

दिल्लीत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेण्यासाठी गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्यासह वडिलांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता. या घटनेचे यूपीतही पडसाद उमटले. तक्रारी वाढल्याने त्यांची ऑक्टोबर २०२३ मध्ये हक्कालपट्टी.

Archana Gautam | Sarkarnama

पुन्हा उमेदवारी?

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ आणि हस्तिनापूर परिसरात पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. याच भागातून त्यांना तिकीट मिळण्याची चर्चा आहे.

Archana Gautam, Priyanka Gandhi | Sarkarnam

NEXT : सोनिया गांधींचे इटलीतील घर 'या' भारतीय व्यक्तीनं घेतलंय विकत!

येथे क्लिक करा.