सोनिया गांधींचे इटलीतील घर 'या' भारतीय व्यक्तीनं घेतलंय विकत!

Rajanand More

सोनिया गांधी

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे 'बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यामध्ये त्यांनी इटलीतील वडिलोपार्जित घर, तिथे घालविलेल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Sonia Gandhi's autobiography 'Belonging: A Journey of Love' | Sarkarnama

वास्तू चर्चेत

सोनिया गांधीचे घर असलेली ही वास्तू त्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. आता इथे त्यांचे कुटुंबीय राहत नाहीत. एका भारतीय व्यावसायिकाने ही वास्तु विकत घेतली आहे.

Sonia Gandhi Italy House | Sarkarnama

सुखदेव सिंग कांग

इटलीमध्ये राहणारे मुळचे पंजाबचे व्यावसायिक सुखदेव सिंग कांग यांनी २०२० मध्ये इटलीतील लुसियाना हे घर खरेदी केले आहे. त्यांनी आपली पत्नी आणि लेकीच्या नावावर हे घर घेतले आहे.

Sukhdev Singh Kang | Sarkarnama

इंडियन हाऊस

सोनिया गांधी यांच्या या घराला 'इंडियन हाऊस' म्हटले जाते. त्यावर तिरंगा असून बाहेर लावलेल्या नामफलकावर 'सोनिया गांधी यांचे जन्मस्थान' असा उल्लेख आहे. सोनिया गांधींचा ९ डिसेंबर १९४६ रोजी याच घरात जन्म झाला होता.

Sukhdev Singh Kang | Sarkarnama

सहा खोल्यांचे घर

इटलीच्या व्हिसेन्झा प्रांतातील लुसियाना येथे दगड आणि काँक्रीटच्या इमारतीमध्ये सहा खोल्यांचे हे घर आहे. कांग यांचे ब्रेस्सियामध्ये घर असून ते कुटुंबासह तिथेच राहतात. दोन्ही घरांमध्ये सुमारे एक तासांचे अंतर आहे.

Sonia Gandhi Italy House | Sarkarnama

कोण आहे कांग?

कांग हे मुळचे पंजापमधील होशियारपूर येथील आहेत. १९९२ मध्ये इटलीला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. सुरूवातीला नोकरी केली. आता व्यावसायिक म्हणून ओळख निर्माण केली आहे.

Sukhdev Singh Kang | Sarkarnama

का घेतले घर?

आपले कुटुंब गांधी कुटुंबीयांचे प्रशंसक असल्याचे कांग यांनी सांगितले. ओळखीतील एका व्यक्तीकडून घराच्या विक्रीबाबत माहिती मिळाल्यानंतर ते खरेदी केल्याचे कांग म्हणाले.

Sonia Gandhi Italy House | Sarkarnama

म्युझियम करणार

सध्या घराच्या देखभालीसाठी काळजीवाहक असून दरवर्षी एक हजार युरो खर्च केला जातो. आता लवकरच या घराचे रुपांतर संग्रहालयात करण्याची इच्छाही कांग यांनी बोलून दाखविली आहे.

Sonia Gandhi Italy House | Sarkarnama

NEXT : जावडेकरांच्या उपस्थितीत झालेला भाजपमध्ये प्रवेश, 'या' नेत्याची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी

येथे क्लिक करा.