Deepak Kulkarni
भारतीय जनता पक्षाने हरयाणातील आपली संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एक मोठं धाडसी राजकीय पाऊल उचललं आहे.
हरयाणा भाजपच्या इतिहासात दुसऱ्यांदा एका महिलेवर थेट प्रदेशाध्यक्षपदासारखी मोठी आणि तितकीच महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी मोहनलाल बदाउली यांच्या जागी हरयाणा प्रदेशाध्यक्षपदी डॉ. अर्चना गुप्ता यांची नियुक्ती केली आहे.
अर्चना गुप्ता यांचा राजकीय आणि सामाजिक वाटचाल ही वैद्यकीय क्षेत्रातून सुरू झाली आणि ती थेट भाजप संघटनेपर्यंत पोहोचली.
गुप्ता व्यवसायाने रेडिओलॉजिस्ट असून त्यांनी रोहतक येथील पीजीआयमधून एमडी पदवी मिळवली आहे. त्या बऱ्याच काळापासून सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात सक्रिय आहेत.
त्यांनी 2010 ते 2016 या कालावधीत विश्व हिंदू परिषदेसाठी जिल्हा समन्वयक, संयोजक आणि हरयाणाच्या उपाध्यक्षपदी काम पाहिले आहे.
भाजपमध्ये सक्रिय भूमिका बजावतानाच अर्चना गुप्ता यांनी महिला मोर्चासोबत काम केले आणि पानिपत प्रदेशात पक्ष मजबूत करण्यावर महत्त्वाचं योगदान दिलं.
त्यांनी 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ सक्रियपणे प्रचार केला. विशेषतः महिला मतदारांमध्ये त्यांची मजबूत पकड असल्याचे मानले जाते.
अर्चना गुप्ता यांनी राज्य सरचिटणीसपदावर काम करताना संघटनेचा विस्तार, महिला सक्षमीकरण आणि बूथ स्तरावर पक्ष मजबूत करण्यात सक्रिय भूमिका बजावली. हरयाणाच्या पुढच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा त्या असण्याची शक्यता आहे.