Income Tax Rules : इन्कम टॅक्सचे नियम बदलले; 'या' 7 मोठ्या बदलांचा तुमच्या पगारावर कसा होणार परिणाम?

Rashmi Mane

इन्कम टॅक्समध्ये मोठे बदल

1 एप्रिल 2026 पासून देशातील इन्कम टॅक्स व्यवस्थेत मोठे बदल लागू झाले आहेत. नवीन नियमांचा थेट परिणाम पगारदार, गुंतवणूकदार आणि करदात्यांच्या खिशावर होणार आहे. काही नियमांमुळे दिलासा मिळणार असला तरी काही खर्च वाढवणारेही ठरणार आहेत.

Income Tax Return | Sarkarnama

नवीन आयकर कायदा लागू

1961 पासून लागू असलेला जुना आयकर कायदा आता बदलण्यात आला आहे. नवीन आयकर अधिनियम 2025 लागू झाला असून नियम अधिक सोपे आणि स्पष्ट करण्यात आले आहेत. मात्र, सध्याच्या टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Income Tax Return | Sarkarnama

ITR भरण्यास अधिक वेळ

सरकारने ITR-3 आणि ITR-4 भरण्याची अंतिम तारीख 31 जुलैवरून 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे करदात्यांना रिटर्न भरण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. ITR-1 आणि ITR-2 ची मुदत मात्र पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.

Income tax free State | Sarkarnama

Revised Return साठी नवा नियम

आता सुधारित ITR भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत वेळ मिळणार आहे. पूर्वी ही मुदत 31 डिसेंबर होती. मात्र 31 डिसेंबरनंतर रिटर्न भरल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

Income tax free Indian state | Sarkarnama

TCS नियमांमध्ये बदल

दारू, स्क्रॅप, कोळसा आणि खनिजांच्या विक्रीवर TCS दर वाढवण्यात आले आहेत. काही व्यवहारांवर आता 2% TCS लागू होणार आहे. मात्र तेंदूपत्ता विक्रीवरील TCS कमी करून दिलासा देण्यात आला आहे.

Income Tax Return filing | Sarkarnama

परदेश प्रवास करणाऱ्यांना दिलासा

विदेश प्रवास पॅकेजवर आता एकसमान 2% TCS लागू होणार आहे. पूर्वी 5% आणि 20% असे वेगवेगळे दर होते. शिक्षण आणि उपचारासाठी परदेशात पाठवलेल्या रकमेलाही कमी TCS लागू होणार आहे.

income tax rule changes | sarkarnama

शेअर मार्केट गुंतवणूकदारांना धक्का

फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगवरील STT वाढवण्यात आला आहे. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये व्यवहार करणे आता अधिक महाग होणार आहे. सक्रिय ट्रेडर्सच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

डिव्हिडंड आणि Buyback वर नवा कर

शेअर बायबॅकवर आता नवीन कर लागू झाला आहे. तसेच डिव्हिडंड मिळवण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर मिळणारी करसवलतही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना अधिक कर भरावा लागू शकतो.

Next : दादर ते ब्रिटनचे महापौर! मराठी डॉक्टर नितीश राऊत यांची मोठी झेप 

येथे क्लिक करा