Rashmi Mane
अर्चना पाटील चाकूरकर उद्या मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
अर्चना पाटील चाकूरकर यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे.
या भेटीनंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या पक्ष प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडणार आहे. यामूळे निश्चितच काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
अर्चना पाटील चाकूरकर या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई आहेत.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकापाठोपाठ एक मोठा फटका बसत आहे. याआधीही काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बसवराज पाटील यांच्यापाठोपाठ अर्चना पाटील चाकूरकर यादेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या प्रवेशानंतर मराठवाड्याच्या राजकारणाची दिशा काय असेल हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
R