Jagdish Patil
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत.
शहांनी वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, तर आंबेडकरांनी त्यांचं शिक्षण कुठून पूर्ण केलं होतं याबाबची माहिती जाणून घेऊया.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयात एकूण 32 पदव्या मिळवल्या होत्या.
डॉ. आंबेडकरांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते.
तर कोलंबिया विद्यापीठातून एमए आणि पीएचडी पदवी प्राप्त केलं, तर कायद्याचे शिक्षण त्यांनी लंडनमधून घेतलं होतं.
बाबासाहेबांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठात काही काळ शिक्षण घेतलं आहे.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली आहे.