Jagdish Patil
UPSC ची परीक्षा देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि अवघड परीक्षांपैकी एक आहे.
प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा क्रॅक केल्यानंतर UPSC च्या मुलाखतीचा टप्पा खूप कठीण मानला जातो.
मुलाखतीत उमेदवाराचे व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता पाहिल्या जातात. मात्र, एखाद्याने मुलाखत घेणाऱ्या पॅनललाच, 'तुमची नोकरी तुमच्याकडेच ठेवा' असं म्हटलं तर काय होईल?
खरंतर असं कोणीही म्हणणार नाही, पण IPS शक्ती अवस्थी यांनी UPSC मुलाखतीत असं वक्तव्य केल्याचा किस्सा VIDEO पॉडकास्टमध्ये सांगितला आहे.
अवस्थींनी सांगितलं की, मुलाखत पॅनलने मला म्हणाले, 'तुमचा चेहरा अभिनेता शर्मन जोशीसारखा दिसतो, तुम्ही त्याचा '3 Idiots' चित्रपट पाहिलाय का?
यावर अवस्थी हो म्हणताच पॅनेलने त्यांना चित्रपटातील त्या अभिनेत्याचा संवाद बोलून दाखवा असं सांगितलं.
तेव्हा अवस्थी यांनी 'आप अपनी नौकरी अपने पास रख लीजिए, मैं अपना एटीट्यूड अपने पास रख लेता हूं.' हा हिंदी डॉयलॉग बोलून दाखवला.
मात्र, हे सर्व त्यावेळी मुलाखतीत पॅनेलसमोर बोलणं सोपं नव्हतं, तरीही मला या मुलाखतीत सर्वात जास्त 190 गुण मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.
शक्ती अवस्थी हे लखनऊचे रहिवासी असून तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक करून ते IPS अधिकारी बनले. सध्या ते नोएडामध्ये DCP पदावर कार्यरत आहेत.