अर्णब चक्रीवादळाचा कहर! समुद्राच्या लाटा रस्त्यांवर धडकल्या; थरकाप उडवणारे PHOTOS

Jagdish Patil

'अर्णब'

बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'अर्णब' चक्रीवादळ आज (ता.२८) दुपारनंतर आंध्र प्रदेशातील यानमजवळ किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे.

Arnab Cyclone | Sarkarnama

तडाखा

या चक्रीवादळाचा तडाखा चेन्नईला बसला असून, समुद्राचे पाणी किनारी भागात शिरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Arnab Cyclone | Sarkarnama

नुकसान

आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे चक्रीवादळामुळे अनेक झाडे कोसळली, वीजवाहिन्यांचेही नुकसान झाले आहे.

Arnab Cyclone | Sarkarnama

बचावकार्य

अग्निशमन दलाकडून रस्त्यांवरील झाडे हटवण्याचे काम सुरू असून, बाधित भागांत बचावकार्य हाती घेण्यात आले आहे.

Arnab Cyclone

जिल्हे

चक्रीवादळाचा २४ बाधित जिल्ह्यातील २.७० कोटी लोकसंख्येला फटका बसलाय. तर १.३५ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Arnab Cyclone | Sarkarnama

रेल्वे

चक्रीवादळामुळे १०० हून अधिक रेल्वे गाड्या रद्द तर चार विमानतळांवरील २१ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

Arnab Cyclone | Sarkarnama

इशारा

पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, ईशान्य महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Arnab Cyclone | Sarkarnama

हवामान विभाग

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम गोदावरी आणि यानमच्या किनारपट्टीवर ताशी ११५ ते १२५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Arnab Cyclone | Sarkarnama

पूर

तसंच अनाकापल्ली, विशाखापट्टणम आणि विजयनगरम जिल्ह्यांतील काही भागांत पुढील सहा तासांत अचानक पूर येण्याचा धोका वर्तवला आहे.

Arnab Cyclone | Sarkarnama

पाऊस

विशाखापट्टणममध्ये २१७ मिमी, कलिंगपट्टणममध्ये १४७ मिमी, काकीनाडामध्ये ११८ मिमी, मछलीपट्टणममध्ये ११५ मिमी आणि पुरीमध्ये ७२ मिमी पाऊस झाला आहे.

Arnab Cyclone

NEXT : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार! मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय जाणून घ्या

Maharashtra Cabinet Decisions | Sarkarnama
क्लिक करा