Jagdish Patil
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ते जाणून घेऊया.
राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत दिली जाणार.
पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट अग्रीम मदतीची रक्कम जमा होणार.
मातोश्री ग्रामशुद्धी शेत-पाणंद रस्ते योजना विकसित भारत-जी राम जी योजनेसह विविध योजनांच्या समन्वयातून सुरू ठेवण्यास मंजुरी.
दिव्यांगांच्या कल्याण, पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील (सर्वसाधारण) एक टक्का निधी वापरण्यास मंजुरी.
जलसंपदा विभागाचा ३९ हजार ७२२ पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर. ५ महामंडळांसह क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना होणार.
पुण्यातील लोहगाव येथे भारत मंडपमच्या उभारणीला गती आणि लातूरमधील मल्हारराव होळकर भटक्या-विमुक्त जमाती सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य मिळणार.
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आता सहायक प्रशासन अधिकारी हे एकच पद राहणार.
धुळे जिल्ह्यातील रावेर येथील २८९ हेक्टर ६९ आर जमीन MIDC च्या विस्तारासाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी.