Success Story : अर्पिता ठुबेंना सॅल्युट! 3 वर्षांत दोनदा UPSC क्रॅक, आधी IPS अन् आता IAS...

Rashmi Mane

UPSC परीक्षा

दरवर्षी मोठ्या संख्येने उमेदवार UPSC परीक्षेत बसतात, परंतु केवळ काही जण हे उद्दिष्ट साध्य करू शकतात.

Arpita Thube | Sarkarnama

अपयशावर मात

काही लोक वारंवार अपयश आल्यावर हिम्मत हारत नाहीत आणि कठोर तयारी करतात आणि यश मिळवतात.

Arpita Thube | Sarkarnama

अर्पिता ठुबे

अशीच एक कहाणी म्हणजे अर्पिता ठुबेची, जी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली खरी पण तिचे ध्येय वेगळे होते. त्यामुळे तिने आयपीएस अधिकारी होऊनही राजीनामा दिला.

Arpita Thube | Sarkarnama

पुन्हा यूपीएससीची तयारी

राजीनाम्याचे कारण म्हणजे तिला आयएएस अधिकारी व्हायचे होते आणि त्यासाठी तिने पुन्हा यूपीएससीची तयारी सुरू केली.

Arpita Thube | Sarkarnama

शिक्षण

अर्पिता ठुबे मूळची महाराष्ट्राची असून तिने बारावीनंतर सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.

Arpita Thube | Sarkarnama

UPSC परीक्षेत निराशा

त्यानंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. 2019 मध्ये तिने UPSC परीक्षा दिली, पण तिची निराशा झाली.

Arpita Thube | Sarkarnama

आयपीएस पदाचा राजीनामा

2020 मध्ये तिने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. तिला 383 वा क्रमांक मिळाला आणि ती आयपीएस झाली. मात्र त्यांनी राजीनामा दिला.

Arpita Thube | Sarkarnama

अखेर आयएएस अधिकारी

2022 मध्ये तिने चौथ्यांदा UPSC परीक्षा दिली आणि त्यात ती यशस्वी झाली. यावेळी ती आयएएस झाली आणि लाखो उमेदवारांसाठी ती मशाल ठरली.

Arpita Thube | Sarkarnama

Next : 2024 मध्ये Google वर सर्वाधिक सर्च झालेले 'हे' आहेत भारतातील 'टॉप 10' चेहरे 

येथे क्लिक करा