सरकारनामा ब्यूरो
आधार कार्ड ज्याप्रकारे अत्यंत आवश्यक दस्तऐवज आहे. त्यासोबतच पॅन कार्ड ही तितकेच आवश्यक आहे.
मोबाइल नंबर, बँकेचे खाते, सरकारी योजना, अशा सर्वच ठिकाणी आधार कार्ड नसल्यास पॅन कार्डचा वापर केला जातो.
पॅन कार्ड हे इन्कम टॅक्सविभागाकडून दिल जाते. यामध्ये पॅनकाकार्ड धारकाचे नाव, जन्मतारीख, स्वाक्षरी, वडिलांचे नाव आणि फोटो असतो..
पॅन कार्डच्या नंबरमध्ये 10 संख्या असतात. यात पहिली 5 अक्षरे, 4 अंक आणि शेवटचा एक अक्षरात पिनकोड दिलेला असतो. प्रत्येक पॅनकार्ड धारकाचा हा नंबर वेगळा असतो.
अल्फा-न्यूमेरिक नंबरमध्ये, पहिले तीन अक्षरे उदाहरणार्थ AAA किंवा ZZZ असा अक्षरात असतात, तर चौथे अक्षर करदात्याची माहिती दर्शवते. त्यामध्ये व्यक्तिसाठी P, कंपनीसाठी C, हिंदू अविभक्त कुटुंबासाठी H आणि जर चौथे अक्षर 'F' असेल तर ते फर्मसाठी असते.
तसेच, G फॉर गव्हर्नमेंट, L फॉर पब्लिक लिमिटेड, आर्टिफिशियल ज्युरिडिकल j आणि 'T' चा वापर ट्रस्टसाठी केला जातो.
पॅन कार्डचे 5 वे अक्षर हे पॅनकार्ड धारकाच्या आडनावाचे पहिले अक्षर आहे. यानंतर यात '0001' ते '9999' मधील कोणत्याही संख्या असू शकतात. आणि, एक शेवटचे अक्षर असा कोड तयार केला जातो.
पॅन कार्डसाठी कोणतीही व्यक्ती ऑफलाइन आणि ऑनलाइन असा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकते. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) आणि (UTIITSL) यूटीआई इंफ्रास्ट्रक्चर एंड टेक्नोलॉजी सर्विसेज लिमिटेड अशा वेबसाइट्स उपलब्ध आहेत.