Jagdish Patil
बांगलादेशातील कोर्टाने हिंदू संत चिन्मय कृष्ण दास यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करत तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
चिन्मय कृष्ण दास हे बांगलादेशमधील इस्कॉन मंदिराचे प्रमुख आहेत.
त्यांचे पूर्ण नाव चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी असे असून याआधी त्यांचे नाव चंदनकुमार धर असे होते.
चिन्मय कृष्ण दास हे 'सम्मिलित सनातनी जोत'चे प्रवक्ता देखील आहेत.
नुकतीच त्यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात हिंदूंच्या सुरक्षेसंदर्भात रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीत अल्पसंख्याक संरक्षण कायदा, मंदिरे आणि मठांच्या संपत्तीच्या संरक्षणाशी संबंधित कायदा बनवण्याची मागणी करण्यात आली होती.
चट्टोग्राम रॅलीनंतरच दास यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या रॅलीत बांगलादेशच्या राष्ट्रध्वजावर भगवा झेंडा फडकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
बांगलादेशात देशद्रोहाच्या गुन्ह्यात जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.