Ganesh Sonawane
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून 18 वर्षांनंतर सुटका झाली. तो आता दगडीचाळीत परतला आहे.
गुन्हेगारी जगतावर कधीकाळी अधिराज्य गाजवलेल्या अरुण गवळीच्या राजकीय आयुष्याचा श्रीगणेशा खेड लोकसभा मतदारसंघातून झाला होता.
1999 च्या खेड लोकसभा मतदारसंघातून अरुण गवळीचा पराभव झाला.
त्यानंतर 2004 मध्ये गवळी यांनी स्वतः स्थापन केलेल्या अखिल भारतीय सेना या पक्षाच्या तिकीटावर चिंचपोकळी- मुंबई या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली.
या निवडणुकीत अरुण गवळी निवडून आले व पहिल्यांदा आमदार झाले.
अरुण गवळी यांनी काँग्रेसचे उमेदवार मधु ऊर्फ अण्णा चव्हाण यांचा तब्बल बारा हजार मतांनी पराभव केला होता.
2004 ते 2009 या काळात अरुण गवळीने आमदारकी भूषवली.
यानंतर 2009 साली झालेल्या भायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र अरुण गवळीला पराभव स्वीकारावा लागला.