Ganesh Sonawane
नाशिकमध्ये युवा रन मॅरेथॉनमध्ये वय वर्ष 65 तरी मंत्री गिरीश महाजन स्वत : धावले. या तंदुरुस्तीचे रहस्य त्यांनी नंतर उघड केलं.
माझे फार वय झालेले नाही. मी तरूणच असल्याचं गिरीश महाजन मिस्किलपणे म्हणतात.
मी रोज पाच ते सात किलोमीटर धावतो. व्यायामशाळेत जातो. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळतो असं महाजनांनी सांगितलं.
आजवरच्या आयुष्यात एकदाही चहा पिलो नाही, चहाची चव देखील आपल्याला माहित नाही असं महाजन यांनी सांगितलं.
मद्य किंवा धूम्रपान करीत नाही. तंबाखू, पानही खात नाही. दारू, बिअर, वा वाईन असे काहीच घेत नाही.
तेलकट व तळलेले पदार्थ खाणे वर्ज्य केल्याचे महाजनांनी सांगितलं.
सकाळी पाच ते सात किलोमीटर चालणे, धावणे असा व्यायाम नियमितपणे सुरू असल्याने माझा 'फिटनेस' टिकून असल्याचे महाजन म्हणाले.
भोजन झाल्यानंतर लगेच झोपता कामा नये. हलका व्यायाम करायला हवा असं महाजन यांनी सांगितलं.
40 वर्षांपासून मी निवडून येत आहे. पाच वर्ष सरपंच होतो. 35 वर्ष आमदार आहे. त्यावरून तुम्ही माझ्या वयाचा अंदाज लावू शकतात असं महाजन म्हणतात