Ganesh Sonawane
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची 18 वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून सुटका झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर अरुण गवळीचा काय प्रभाव पडू शकतो याकडे राजकीय जाणकार लक्ष वेधत आहेत.
भायखळा हा अरुण गवळीचा बालेकिल्ला मानला जातो. येथील 3.50 लाख मतदारांवर गवळीचा प्रभाव आहे.
गवळी तुरुंगात असताना त्याची मुलगी गीता गवळीने सातत्याने या भागातून महानगर पालिकेची निवडणूक जिंकली आहे.
अरुण गवळी स्वत: अपक्ष आमदार राहिला आहे. चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून 2004 साली त्याने अपक्ष निवडणूक जिंकली होती. त्याआधी लोकसभा निवडणुकीत त्याने तब्बल 92 हजार मतं मिळवली होती.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हेत्येप्रकरणी तुरुंगात गेल्यानंतर अरुण गवळीचा तसा राजकारणाशी थेट संबंध राहिला नाही.
गवळीच्या अखिल भारतीय सेनेने महापालिकेत नेहमी शिवसेनेला साथ दिली.
पण आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत गवळीची साथ कोणाला मिळते? याची उत्सुक्ता आहे.