Ganesh Sonawane
या वेळी वितरण वाहनांना हिरवा झेंडा दाखवून
उत्पादने विक्री व वितरणासाठी रवाना झाली.
देशातील प्रत्येक कुटुंबापर्यंत परवडणारी, दर्जेदार आणि पोषक अन्नधान्य उत्पादने पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
फेज १ आणि फेज २ मध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद
लाखो कुटुंबांना परवडणारे अन्नधान्य मिळाले.
पहिल्या दोन फेज अंतर्गत, एकूण १ लक्ष ५ हजार मेट्रिक टन भारत तांदूळ, भारत आटा आणि भारत हरभरा डाळ व ४ लाख ८८ हजार मेट्रिक टन हरभऱ्याचे वितरण करण्यात आले.
आता कांदा २४ रुपये प्रति किलो, आटा ३१.५० रुपये प्रति किलो आणि तांदूळ ३४ रुपये प्रति किलो दराने वितरण सुरू करण्यात आले आहे.
या भारत ब्रँड उत्पादनांच्या वितरणातून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला पंकज भुजबळ, बापूसाहेब भुजबळ
आणि नाफेड अधिकारी उपस्थित होते.