Ganesh Sonawane
अरुणाचल प्रदेशची किवी फळासाठी ओळख निर्माण व्हावी यासाठी सरकारने “किवी मिशन 2025-2035” सुरु केले आहे.
मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात केली. चहा जसा आसामला ओळख देतो, तशीच किवीमुळे अरुणाचलला नवी ओळख मिळेल असं ते म्हणाले.
या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना किवी शेतीत संधी देणे आणि सेंद्रिय शेतीला चालना देणे आहे.
हा 10 वर्षांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्यात कृषी क्रांती घडवण्याचे लक्ष्य ठेवतो.
या मिशनअंतर्गत १३ जिल्ह्यांत किवी मॉडेल तयार केले जाणार असून झिरो खोऱ्यात पहिला प्रकल्प सुरु झाला आहे.
या उपक्रमामुळे अरुणाचल प्रदेश शाश्वत शेतीत देशाचे आदर्श उदाहरण ठरणार आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून राज्यात कृषी क्रांती होईल आणि अरुणाचल प्रदेशला भारतातील कृषी क्षेत्रात नवीन ओळख निर्माण होईल.
अरुणाचल सरकारने शेतकऱ्यांसाठी "मासिक पीक सन्मान योजना" देखील सुरू केली आहे. त्यात दोन शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.