Rajanand More
तरुणांच्या हिंसक आंदोलनानंतर नेपाळमध्ये राजकीय संकट उभे ठाकले आहे. पंतप्रधानांनी राजीनामा देत देश सोडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता नवीन पंतप्रधान कोण, याची चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान पदासाठी बालेन शाह यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. आंदोलनकांनी शाह यांना त्यासाठी साकडं घातलं आहे. त्यांनीही तसे संकेत दिले आहेत.
शाह हे सध्या काठमांडूचे महापौर आहेत. त्यांनी तरूणांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत आधीच त्यांचे मन जिंकलं आहे. प्रामुख्याने काठमांडूतच आंदोलनाचा भडका उडला आहे.
महापौरपदाचा राजीनामा देऊन देशाचे नेतृत्व करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
बालेन शाह हे पेशाने इंजिनिअर आहेत. रॅपर म्हणूनही त्यांनी नशीब आजमावले आहे. त्यामुळे तरूणांमध्ये आधीपासून त्यांची लोकप्रियता आहे.
शाह यांची जीवनशैली तरूणाईला आकर्षित करणारी आहे. त्यांच्याकडे स्टायलिश गाड्या आहेत. ते केवळ 35 वर्षांचे असल्याने तरूणाईचा आश्वासक चेहरा म्हणून आता त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
बालेन शाह यांना 2033 मध्ये टाईम नियतकालिकामध्ये प्रतिष्ठित 100 नवोदित नेत्यांमध्ये स्थान मिळाले होते. त्यांचं खरं नाव बालेंद्र शाह आहे.
बालेन शाह यांची एकूण संपत्ती नेपाळी रुपयांमध्ये 5 ते 6 कोटी रुपयांची आहे. त्यांचे मासिक कमाई सुमारे 3 लाख रुपये एवढी आहे. कन्स्ट्रक्शन कंपन्या तसेच सोशल मीडियातूनही त्यांना मोठी कमाई होते.