Raghav Chadha Story: 'आप'नं संसद गाजवणाऱ्या खासदार राघव चढ्ढांना का दिला अचानक मोठा झटका? केजरीवालांना खटकल्या 'या' गोष्टी...

Deepak Kulkarni

'आप'चा मोठा निर्णय

एकेकाळी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू शिलेदार व तरुण तडफदार चेहरा असलेल्या खासदार राघव चड्ढा उपनेतेपदावरून हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

AAP MP Raghav Chadha | Sarkarnama

राज्यसभा सचिवालयाला पत्र

'आप'ने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून चड्ढा यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून तातडीनं हटवण्याची विनंती केली आहे. त्यांच्या जागी आता पंजाबमधीलच दुसरे खासदार अशोक मित्तल यांची वर्णी लावण्याचा प्रस्ताव पक्षानं दिला आहे.

AAP MP Raghav Chadha | Sarkarnama

भाजपशी वाढती जवळीक

इतकंच नव्हे तर, चड्ढा यांना यापुढे राज्यसभेत बोलण्यासाठी 'आप'च्या निर्धारित कोट्यातून वेळ दिला जाऊ नये, असंही आपनं पत्रात म्हटलं आहे. आपच्या या तडकाफडकी निर्णयामागं चड्ढा यांचं भाजपशी वाढती जवळीक मानलं जात आहे. आणखीही चार प्रमुख कारणं असल्याची चर्चा आहे.

AAP MP Raghav Chadha | Sarkarnama

पक्षापासून दूर

स्वाती मालिवाल प्रकरण देशभरात गाजत असताना राघव चड्ढा हे आम आदमी पक्षापासून अंतर राखून होते.

AAP MP Raghav Chadha | Sarkarnama

कोणतीही प्रतिक्रिया नाही...

दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया तुरूंगातून सुटल्यानंतर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, कोणतेही ट्विट केले नव्हते.

AAP MP Raghav Chadha | Sarkarnama

स्वतःचा पीआर

गेल्या काही दिवसांत चढ्ढा यांनी रिचार्ज कंपन्या, पॅटर्निटी लिव्ह यांसारखे मांडलेले मुद्दे चर्चेचे ठरले होते. पण आपच्या इतर खासदारांना त्यांच्यामुळे बोलण्याची संधी कमी मिळाल्यानं नाराजी व स्वतःचा पीआर वाढवत असल्याची टीका केली जात होती.

AAP MP Raghav Chadha | Sarkarnama

प्रचारकांच्या यादीतून वगळलं

आम आदमी पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून राघव चड्ढा यांना वगळण्यात आलं होतं. कारण खासदार झाल्यानंतर त्यांची बदलेली वागणूक पक्ष नेतृत्वाला आधीच खटकली होती.

AAP MP Raghav Chadha | Sarkarnama

समन्वयाचा अभाव

आम आदमी पक्ष अडचणीत असताना चड्ढा अन् महत्त्वाच्या नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला होता. तसेच संसदेत कोणते मुद्दे उपस्थित करावेत आणि त्यांना दिलेल्या वेळेत किती वेळ बोलावे, यावर चड्ढा यांनी कोणाशीही चर्चा केली नसल्याचं बोललं जात आहे.

AAP MP Raghav Chadha | Sarkarnama

कार्यक्रमांपासून अलिप्त

आपची जंतर-मंतरवरील रॅली आणि अरविंद केजरीवाल यांच्या मोठ्या पत्रकार परिषदेसह इतरही अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये खासदार राघव चड्ढा हे सार्वजनिक मंचांवर किंवा सोशल मीडियावर पक्षासोबत उभे असल्याचं समोर आलं नव्हतं.

AAP MP Raghav Chadha | Sarkarnama

NEXT: तुकाराम मुंढेंचा संघर्ष की सिस्टमचा गेम? 21 वर्षांत 24 वेळा बदली!

IAS officer Tukaram Mundhe Journey from Collector to Secretary: | Sarkarnama
येथे क्लिक करा...