Mangesh Mahale
शिस्तप्रिय आणि तडजोड न करणाऱ्या प्रशासकीय शैलीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. २००५ च्या तुकडीचे हे आयएएस अधिकारी गेल्या एकवीस वर्षांत तब्बल चोवीस वेळा बदली झाली आहे.
भ्रष्टाचाराविरोधातील ठाम भूमिका आणि शिस्तप्रिय कारभारामुळे अनेक पदांवर त्यांचा कार्यकाळ अल्प राहिला, तरी त्यांनी प्रत्येक ठिकाणी ठसा उमटवला.
प्रशासनातील पारदर्शकता आणि काटेकोर अंमलबजावणी ही त्यांची ओळख बनली आहे. राज्यातील विविध महत्त्वाच्या विभागांत त्यांनी काम पाहिले आहे.
कारकीर्द सततच्या बदल्यांनी गाजली. नियमांचे काटेकोर पालन आणि गैरव्यवहारांवर कठोर कारवाई यामुळे त्यांना राजकीय व प्रशासकीय दबावालाही सामोरे जावे लागले.
अनेक ठिकाणी त्यांचा कार्यकाळ वर्षभरापेक्षाही कमी राहिला. तरीही त्यांनी घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या सुधारणा दीर्घकाळ चर्चेत राहिल्या.
आरोग्य, कृषी, परिवहन, पाणीपुरवठा, नियोजन, आदिवासी विकास अशा विविध क्षेत्रांत काम केले. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनी आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली.
कृषी व पशुसंवर्धन खात्याचे सचिव म्हणून काम पाहिले. याशिवाय मराठी भाषा विभाग आणि असंघटित कामगार विभागातही त्यांनी भूमिका बजावली.
नाशिक, नवी मुंबई आणि नागपूर महापालिकांमध्ये आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेवर भर दिला.
नागपूर महापालिकेतील त्यांचा कार्यकाळ कठोर निर्णयांमुळे वादग्रस्त ठरला.
पुण्यात पीएमपीएलचे प्रमुख म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. या सर्व पदांवर त्यांनी प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले.