Rashmi Mane
IAS आणि IPS अधिकारी दोघंही देशाचं भवितव्य घडवतात – पण त्यांचे प्रशिक्षणाची सुरुवात कुठून होते?
बऱ्याच लोकांना माहित आहे की आयएएस अधिकाऱ्यांना एलबीएसएनएएमध्ये प्रशिक्षण दिले जाते, परंतु नवीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कुठे होते हे अनेकांना माहीत नसते.
IAS अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग मसुरी येथील हिमालयाच्या कुशीत असलेलं लाल बहादुर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन येथे होते.
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी SVPNPA चे मुख्य उद्दिष्ट देशासाठी असे पोलीस अधिकारी तयार करणे आहे जे धैर्य, प्रामाणिकपणा आणि समर्पणाच्या भावनेने पोलीस दलाचे नेतृत्व करू शकतील.
एसव्हीपीएनपीए हे देशातील एक प्रमुख पोलिस प्रशिक्षण केंद्र आहे, जे हैदराबादपासून ८ किमी अंतरावर, हिरव्यागार टेकड्या आणि हैदराबाद बंगलोर महामार्गाच्या मध्यभागी सुमारे ३०७ एकर परिसरात वसलेले आहे.
LBSNAA: प्रशासन, धोरण, नेतृत्व
SVPNPA: कायदा, फिजिकल ट्रेनिंग, ऑपरेशन्स
IAS: ग्रामीण दौरे, पॉलिसी प्रोजेक्ट्स, मॅनेजमेंट स्किल्स
IPS: शस्त्रप्रशिक्षण, अनुशासन, फील्ड ऑपरेशन्स
आयपीएस केडर हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाद्वारे नियंत्रित केले जाते.