Rashmi Mane
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धक्क्यांची मालिका थांबत नाहीये.
सीएम केजरीवाल यांचे खासगी सचिव (पीए) बिभव कुमार यांना दक्षता विभागाने निलंबित केले आहे.
ईडीने मद्य घोटाळ्याप्रकरणी विभव कुमारचीही अनेकवेळा चौकशी केली आहे. त्यानंतरच ईडीकडून सातत्याने होत असलेली चौकशी पाहता बिभव कुमार यांना हटवण्यात आले आहे.
अटक झाल्यानंतर केजरीवाल यांना एकावर एक धक्के मिळत आहेत. त्यातील पहिला धक्का म्हणजे राजकुमार आनंद यांनी आज राजीनामा दिला आहे.
मागील दोन दिवसांत केजरीवालांना पहिला धक्का 9 एप्रिलला बसला. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याची याचिका केजरीवालांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केली होती. अटक योग्यच असल्याचे सांगत हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
केजरीवालांनी वकिलांना आठवड्यातून दोनऐवजी पाचवेळा भेटता यावे, अशी मागणी स्थानिक कोर्टाकडे केली होती. पण ही मागणीही बुधवारी फेटाळण्यात आली. केजरीवालांसाठी दोन दिवसांतील हा दुसरा धक्का होता.
सुप्रीम कोर्टाने केजरीवालांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यांनी दिल्ली हायकोर्टाच्या निकालाला आव्हान दिले आहे. त्यामुळे केजरीवालांना पुढील आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.