Rajanand More
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आधीपासूनच रामराज्यातील दहा तत्वांचे पालन केले जात असल्याचे सांगितले आहे.
दिल्ली सरकारने गरीब आणि बेरोजगारांना मोफत रेशन दिले. नाईट शेल्टरही उभारले जात आहेत.
दिल्लीकरांना मोफत औषधे आणि उपचार दिले जात आहेत. सरकारी रुग्णालयांची स्थिती सुधारली, ठिकठिकाणी क्लिनिक सुरू केले.
दिल्लीत चोवीस तास वीज उपलब्ध असून पात्र रहिवाश्यांना मोफत वीज दिली जात असल्याचे केजरीवालांनी सांगितले.
सर्व स्तरातील मुलांना सरकारी शाळेत समान शिक्षणाची संधीची खात्री दिली. रामायणात राजा आणि सर्वसामान्यही एकत्र गुरूकुलात शिकले.
दिल्लीने पाण्याच्या कमतरतेच्या समस्येवर मात केली आहे. अनेक भागांत मोफत पाणीपुरवठा सुरू आहे.
कायद्याच्या अंमलबजावणीचे आव्हाने असूनही दिल्लीकरांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न. सीसीटीव्ही नेटवर्क, पोलिसांना निधी उपलब्ध करून दिला.
दिल्ली सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनमध्ये एक हजारांवरून अडीच हजारांपर्यंत वाढ केली. ज्येष्ठांसाठी धार्मिक सहलींचे आयोजन.
नवीन शाळा, मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून नवीन रोजगार निर्माण केले. जॉब पोर्टलच्या माध्यमातून 10 ते 12 लाख तरुणांना रोजगार मिळाला.
देशात दिल्लीत सर्वात कमी महागाईचा दर आहे. देशाची सरासरी 6 टक्के असून दिल्लीत हा दर 2.95 टक्के आहे.
धर्म, जात किंवा आर्थिक स्थिती यापलिकडे जाऊन दिल्लीत प्रत्येकाने एकत्रितपणे समाजाच्या भल्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा दिली जाते.