Chetan Zadpe
नुकत्याच अयोध्येत राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला. यानंतर गुजरात मधील हिरेव्यापारी दिलीप कुमार वी लाखी यांनी 68 कोटी रुपयांचे सोने रामलल्लाच्या चरणी दान केले आहे.
राम मंदिराच्या तळमजल्यावर गर्भगृहाच्या दरवाजासह एकूण 15 सुवर्ण दरवाजे बसवण्यात आले आहेत.
सुरतमधील लाखी एका हिरे व्यापारी कुटुंबाने अयोध्येतील भव्य राम मंदिरासाठी 101 किलो सोने दान केले आहे. ही अयोध्येला मिळालेली आजपर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे.
दिलीपकुमार व्ही लाखी यांचे कुटुंब गुजरातच्या सुरतमधील सर्वात मोठ्या हिरे व्यापाऱ्यांपैकी एक आहे. त्यांचे कुटुंब दीर्घकाळापासून हिऱ्यांच्या व्यवसायात आहे.
सध्या सोन्याचा भाव 68 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. यानुसार 101 किलो सोन्याची एकूण किंमत सुमारे 68 कोटी रुपये होती.
दिलीप कुमार व्ही लाखी यांचे वडील विशिंददास होलाराम हिरे व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील होते, ते भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीपूर्वी 1944 मध्ये जयपूरला आले.
आज दिलीप कुमार वी लाखी यांचा सुरत, भारत येथे जगातील सर्वात मोठा हिरा पॉलिशिंग कारखाना आहे, ज्यामध्ये 6,000 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.