Deepak Kulkarni
देशाची राजधानी दिल्लीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. भाजपनं मोठा गेम फिरवला आहे.
दिल्लीची सत्ता गमावल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या 10 खासदारांपैकी 7 खासदार फुटले आहेत.
आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. राज्यसभा खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला असून आपमधील दोन तृतीयांश खासदार भाजपमध्ये सामील होत आहेत.
'आप'चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले राघव चड्ढा 2022 मध्ये पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आले.ते सर्वात तरुण खासदारांपैकी एक होते.चड्ढा आपल्या आक्रमक शैलीसाठी आणि संसदेत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी चर्चेत होते.
डॉ. अशोक कुमार मित्तल हे आम आदमी पार्टीचे पंजाबमधील राज्यसभा खासदार आहेत. प्रसिद्ध 'लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी' (LPU) चे संस्थापक कुलपती म्हणून ओळखले जातात.
संदीप कुमार पाठक हे आम आदमी पक्षातून राजकारणी झालेले भारतीय आणि एप्रिल 2022 पासून पंजाबचे राज्यसभा खासदार आहेत. ते आयआयटी दिल्लीचे माजी सहाय्यक प्राध्यापक, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एमआयटीचे माजी संशोधन सहकारी आहेत.
स्वाती मालीवाल या 'आम आदमी पार्टी' (AAP) च्या नेत्या, राज्यसभेच्या खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) माजी अध्यक्षा आहेत. त्यांनी महिला सुरक्षा आणि हक्कांसाठी अनेक वर्षे सामाजिक कार्य केले आहे. 2024 मध्ये, अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर झालेल्या कथित मारहाण प्रकरणामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
हरभजन सिंग यांनी हे एक निवृत्त भारतीय क्रिक्रेटर असून त्यांनी मार्च 2022 मध्ये आम आदमी पार्टीकडून पंजाबमधून राज्यसभेची उमेदवारी मिळवली आणि ते बिनविरोध निवडून आले आहे. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 2028 पर्यंत आहे.
राजेंद्र गुप्ता हे एक भारतीय उद्योगपती आणि आम आदमी पार्टीचे (AAP) पंजाबमधील राज्यसभेचे खासदार आहेत. नोव्हेंबर 2025 पासून ते पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत.
विक्रमजीत सिंग साहनी हे आम आदमी पक्षाचे पंजाबमधील राज्यसभा खासदार आहेत. साहनी हे एक उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आहेत. जुलै 2022 मध्ये पंजाबमधून आपच्या तिकीटावर बिनविरोध राज्यसभेवर निवडून आले आहेत. 2008 मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला होता.