Arvind Sawant : शिवसेनेचे दोनवेळचे खासदार अरविंद सावंतांच्या नावावर अवघे २०० चौरस फुटांचे घर

Vijaykumar Dudhale

मालमत्ता एक कोटीनी वाढली

अरविंद सावंत यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत एक कोटी चार लाखांनी वाढ झाली आहे.

Arvind Sawant | Sarkarnama

चल संपत्तीत दुप्पटीने वाढ

अरविंद सावंत याच्याकडे १ कोटी १ लाख ९१ हजार ३५४ रुपये चल संपत्ती होती. त्यांची चल संपत्ती गेल्या पाच वर्षांत दोन कोटी १३ लाख १९ हजार ३२२ रुपयांपर्यंत पोचली आहे.

Arvind Sawant | Sarkarnama

अचल संपत्तीतही वाढ

सावंत यांची अचल संपत्ती (स्थावर मालमत्ता ) ही २०१९ मध्ये ३१ लाख बारा हजार रुपये होते, ती २०२४ मध्ये ८० लाख १२ रुपये झाली आहे.

Arvind Sawant | Sarkarnama

सावंतांकडे एकच वाहन

अरविंद सावंत यांच्याकडे एकच वाहन असून होंडा सिटी ही एकमेव मोटार त्यांच्या नावावर आहे.

Arvind Sawant | Sarkarnama

सोन्याच्या दागिन्यांतही वाढ

अरविंद सावंत यांच्याकडे २०१९ मध्ये १९३ ग्रॅम सोने होते, त्याची किमत त्यावेळी पाच लाख २८ हजार होती. सावंत यांच्याकडील सोन्यात वाढ झाली असून २०२४ मध्ये ते सोने २५१ ग्रॅमवर पोचले आहे. त्याची किंमत १७ लाख एक हजार ४९६ रुपये एवढी आहे.

Arvind Sawant | Sarkarnama

सावंत दांपत्याकडे अकरा किलो चांदी

अरविंद सावंत यांच्याकडे तीन किलो, तर त्यांच्या पत्नीकडे आठ किलो चांदी आहे. या अकरा किलो चांदीची एकत्रित किंमत ९ लाख १७ हजार ६५० रुपये झाली होती.

Arvind Sawant | Sarkarnama

मुंबईत केवळ २०० चौरस फुटाचे घर

८) अरविंद सावंत यांच्याकडे केवळ २०० चौरस फुटाचे घर असल्याचे संपत्ती विवरणपत्रात नमूद केले आहे. ते घर शिवडीतील मिठाबाई इमारत असा पत्ता नमूद करण्यात आली आहे

Arvind Sawant | Sarkarnama

तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्यासाठी अरविंद सावंत यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यात त्यांना तिसऱ्यांदा यश मिळते हे पाहावे लागेल.

Arvind Sawant | Sarkarnama

ठाकरेंना जमलं नाही, ते शिंदेंनी घडवून आणलं; कट्टर शिवसैनिकाची घरवापसी!

Sanjay Nirupam | Sarkarnama