Sanjay Nirupam Join Shivsena: ठाकरेंना जमलं नाही, ते शिंदेंनी घडवून आणलं; कट्टर शिवसैनिकाची घरवापसी!

Deepak Kulkarni

तब्बल वीस वर्षांनी निरुपम यांची घरवापसी

माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी तब्बल वीस वर्षांनी घरवापसी करत आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

Sanjay Nirupam | Sarkarnama

शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

ठाण्यातील आनंदआश्रम येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेशावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

Sanjay Nirupam | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांची भेट...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आपण पुढील दोन दिवसांत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निरुपम यांनी जाहीर केले होते.

Sanjay Nirupam | Sarkarnama

मोठी जबाबदारी

शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर संजय निरुपम यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. 

Sanjay Nirupam | Sarkarnama

प्रवक्ते तसेच समन्वयक

निरुपम हे आता शिवसेनेचे प्रवक्ते तसेच समन्वयक म्हणून काम पाहतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Sanjay Nirupam | Sarkarnama

Sarkarnama पत्रकार, संपादक म्हणून काम

संजय निरुपम हे काँग्रेसचे माजी खासदार आहेत. त्यांनी काही काळ पत्रकार, संपादक म्हणून काम केले आहे.

Sanjay Nirupam | Sarkarnama

काँग्रेसमध्ये प्रवेश

1996 मध्ये शिवसेनेने त्यांना राज्यसभेत पाठवलं होतं. ते 1996 ते 2006 पर्यंत राज्यसभेचे खासदार होते. त्यांनी 2005 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये मुंबई उत्तर लोकसभा निवडणुकीत निरुपम विजयी झाले.

Sanjay Nirupam | Sarkarnama

निवडणूक लढण्यासाठी संजय निरुपम आग्रही

मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी संजय निरुपम आग्रही होते.

Sanjay Nirupam | Sarkarnama

...म्हणून सोडली काँग्रेस!

ही जागा ठाकरे गटाला मिळाल्याने काँग्रेसवर Congress, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर उघड टीका करत संजय निरुपम यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला.

Sanjay Nirupam | Sarkarnama

NEXT : राहुल शेवाळे यांची मुलं लखपती; एकूण संपत्ती किती?