Arvinder Singh Lovely : दिल्लीत काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली पुन्हा भाजपमध्ये दाखल!

Mayur Ratnaparkhe

दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंग लवली यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. 

 यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीयमंत्री हरदीप सिंह पुरी, दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा सुद्धा उपस्थित होते.

अरविंद सिंग लवली यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाचे सदस्यत्वही देण्यता आले.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अरविंद सिंग लवली यांचा भाजपात प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे.

काँग्रेसने आम आदमी पार्टीसोबत युती करण्याला लवली यांचा विरोध होता

लवली या अगोदरही भाजपमध्ये होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते आता पुन्हा त्यांची घरवापसी झाली आहे.

ऑगस्ट 2023 मध्ये काँग्रेस पक्षाने दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली होती.

2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लवली यांची पुन्हा पक्षाच्या दिल्ली युनिटच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

1998 मध्ये लवली यांनी दिल्लीतील गांधी नगर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर पहिली निवडणूक लढवली होती.

NEXT : अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती?