Jagdish Patil
नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील महापालिका निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या MIM पक्षाचे 125 नगरसेवर विजयी झालेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही एमआयएम पक्षाने चांगली कामगिरी केली.
मुंबईत या पक्षाचे 8 नगरसेवक विजयी झाले. तर यापैकी एका हिंदू उमेदवाराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
कारण MIMची मुस्लिमांचा पक्ष अशी ओळख आहे. अशा पक्षाकडून एका हिंदू उमेदवाराने निवडणूक लढवणं आणि जिकणं आश्चर्यकारक मानलं जात आहे.
एमआयएमकडून निवडणुकीत विजयी झालेल्या या हिंदू उमेदवाराचं नावं आहे विजय उबाळे.
उबाळे हे मुंबईत एमआयएमकडून विजयी झालेले एकमेव हिंदू नगरसेवक ठरले आहेत.
उबाळे हे गोवंडीतील प्रभाग क्रमांक 140 मधून 4 हजार 945 मते मिळवत विजयी झालेत.
पक्षाने उमेदवारी दिली पण उबाळे यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी उधारीवर पैसे घेत ही निवडणूक लढवली.
उबाळे हे उच्चशिक्षित असून ते खाजगी शिकवणीचे वर्ग चालवतात. त्यांचा अपवाद वगळता MIMचे इतर विजयी उमेदवार मुस्लीम आहेत.