Sahar Shaikh MIM: ओवैसींची 'शेरनी', 'एमआयएम'चा आक्रमक तरुण महिला चेहरा, सहर शेख सोशल मीडियावर का आहे चर्चेत?

Deepak Kulkarni

'एमआयएम'ची तरुणी जिंकली...

ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधील एका निकाल प्रचंड चर्चेचा विषय ठरला. या प्रभागातून 'एमआयएम'ची सहर शेख नावाची तरुणी निवडून आली आहे. 

Sahar Shaikh | Sarkarnama

आव्हाडांशी टोकाचा वाद

मुंब्रा येथील सहरचे वडील युनूस शेख व आमदार जितेंद्र आव्हाडांमध्ये टोकाचा वाद आहे.

Sahar Shaikh | Sarkarnama

राष्ट्रवादीनं नाकारली उमेदवारी...

नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत युनुस शेख यांनी मुलगी सहरसाठी उमेदवारी मागितली होती. पण राष्ट्रवादीनं ती नाकारल्यामुळे अखेर तिने एमआयएमच्या तिकीटावर ही निवडणूक लढवली होती.

Sahar-Shaikh | Sarkarnama

आव्हाडांना डिवचलं

मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मधून विजय मिळवल्यानंतर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेखने जाहीर सभेत बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही डिवचलं होतं.

Sahar-Shaikh | Sarkarnama

ठाणे महानगरपालिकेत एन्ट्री

सहर शेखनं एमआयएमच्या तिकीटावर विजय खेचून आणत ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून धडाक्यात एन्ट्री घेतली होती.

Sahar Shaikh | Sarkarnama

आक्रमक तरुण महिला चेहरा

'एमआयएम'ला या महापालिका निवडणुकीत आता सहर शेखच्या रुपानं एक आक्रमक तरुण महिला चेहरा मिळाल्याची चर्चा आहे.

Sahar Shaikh | Sarkarnama

125 जागांवर विजय

राज्यातील नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये 29 पैकी 13 महानगरपालिकांमध्ये एमआयएम पक्षानं तब्बल 125 जागा जिंकत जबरदस्त कामगिरी केली आहे.त्यात ठाण्यातील प्रभाग क्रमांक 30 मधील सहर शेखचा निकालाची जोरदार चर्चा झाली.

Sahar-Shaikh | Sarkarnama

भाषण व्हायरल

सहर शेख या तरुण नवनिर्वाचित महिला नगरसेवकानं केलेलं विजयानंतरचं भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर विरोध आणि समर्थनाच्या प्रतिक्रिया उमटत आहे.

Sahar-Shaikh | Sarkarnama

मोठी संधी

सहर शेखने पहिल्याच विजयी सभेत आपला आक्रमकपणा दाखवल्यानंतर तिला ठाणे महापालिकेतही एमआयएमचा मुख्य आवाज बनण्याची मोठी संधी आहे.

Sahar-Shaikh | Sarkarnama

NEXT: मुंबई महापालिकेतील सर्वात श्रीमंत नगरसेवक कोण? 'या' टॉप 10 नगरसेवकांची संपत्ती पाहून थक्क व्हाल

BMC (1).jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...